पोलादपूरची आपत्ती व्यवस्थापन तयारी पूर्ण

। पोलादपूर । वार्ताहर ।
मान्सूनच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींना अधिक समर्थपणे तोंड देण्यासाठी गावपातळीपासून ते तालुकापातळीपर्यंत ग्रामस्तावरील, अधिकारी व संस्था यांचा योग्य प्रकारे समन्वय राखणे, प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर करणे व उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम रितीने उपयोग करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. तहसिलदार दीप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाली असून आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.
पोलादपूर तालुका हा जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात छोटा तालुका आहे. हा तालुका राज्य शासनाने संपूर्ण डोंगरी म्हणून घोषित केला आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये एकूण तीन महसूल मंडळे व 20 तलाठी सजे मध्ये मिळून 88 गावामध्ये 212 वाड्यांचा समावेश होतो. 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या 45 हजार 464 एवढी आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीलगत महाड, खेड, या दोन तालुक्याची व सातारा जिल्हयाची हर जोडून आहे. तालुक्यामध्ये प्रामुख्याने शेती हाच एकमेव व्यवसाय असून भात हे प्रमुख पिक आहे. तालुक्यामधून सावित्री ही एक प्रमुख नदी वाहते. त्यांच्या काठावरील एकूण 4 गावांना कमी अधिक प्रमाणामध्ये पुराचा धोका संभवतो, तसेच याशिवाय तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. 66-(मुंबई-गोवा) रस्ते अपघाताची शक्यता विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. सन 1989, 2005 व 2021 साली अतिवृष्टी व पूरामुळे तालुक्यात अतोनात जीवित व वित्तहानी झाली होती.

मान्सूनच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींना अधिक समर्थपणे तोंड देण्यासाठी गावपातळीपासून ते तालुकापातळीपर्यंत ग्रामस्तावरील, अधिकारी व संस्था यांचा योग्य प्रकारे समन्वय राखणे, प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर करणे व उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम रितीने उपयोग करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची मान्सूनपूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आगामी मान्सून आपत्ती काळात प्रशिक्षित मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध होण्यासाठी पोलादपूर तालुक्यात दि.17 व दि.18 फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. नागरी संरक्षण दल (छऊठऋ) उरण यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थी पूर, दरड मध्ये अडकल्यास सुटका करणे, जखमी व्यक्तींना प्रथमोपचार, दोरखंडाच्या विविध गाठीचा वापर संकट काळात करणे, स्ट्रेचर चा वापर आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. महाड येथे सर्व शासकीय कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, स्वयंसेवक यांचे एनडीआरएफ मार्फत दि 8 मार्च रोजी एक दिवशीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. तालुक्यात सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक नैसर्गिक आपत्ती बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी आपत्ती दरम्यान करावयाच्या कार्याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

Exit mobile version