| रसायनी | वार्ताहर |
भारतीबेन रमणिकलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिक व आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मोहोपाडा, कोटवलवाडी, गोरेवाडी, धामसेवाडी, विठ्ठलवाडी, भोमलवाडी, चिंचवाडी, खांडस, नांदगाव आदी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व आदिवासी बांधवांना भारतीबेन रमणिकलाल शाह चॅरिटेबळ ट्रस्टच्या ट्रस्टी शैलेश शाह, रांजन शाह, धवल सावळा यांच्यावतीने वाटप करण्यात आले. यावेळी राकेश चव्हाण, बाळू खाडे, प्रेम आयंगर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक व आदिवासी बांधवांना ऐन थंडीच्या दिवसात ब्लँकेट मिळाल्याने त्यांनी भारतीबेन रमणिकलाल शाह चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.