| पनवेल | वार्ताहर |
निष्काळजीपणे भरधाव वेगात कार चालवताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पदपथावरील सुरक्षा जाळीला धडकून अपघात झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास मोठा खांदा येथील दोन ब्रिजच्यामध्ये जेएनपीटी रोडवर कामोठे येथे घडली. या अपघातात कारमधील सहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी समशेर अन्सारी (रा. पनवेल) याच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली आहे.