| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथील दानशूर व्यक्ती नितीन शाह आणि त्यांचे बंधू दीपक शाह यांच्या माध्यमातून नेरळजवळील धामोते येथे असलेल्या अनाथ मुलींच्या आश्रमात कपडे आणि खाऊ यांचे वाटप केले. अनाथ आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे या अनाथ मुली राहतात आणि त्यानंतर जवळच्या शाळेत शिक्षण घेऊन शिक्षण पूर्ण करतात.
नेरळ-कळंब रस्त्यावर आगरी समाज हॉलच्या समोर आसरा अनाथ मुलींचे आश्रम आहे. त्या ठिकाणी समाजातील अनाथ मुलींचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम आसरा अनाथाश्रम करीत असते. याच अनाथ आश्रममध्ये राहणार्या मुलींसाठी माथेरान येथील व्यावसायिक नितीन शहा आणि त्यांचे बंधू दीपक शहा यांच्या माध्यमातून कपडे आणि खाऊ यांचे वाटप यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आसरा अनाथाश्रम मधुची व्यवस्थापिका सुवर्णा पिंगळे तसेच माथेरान येथील शिक्षक संघपाल वाठोरे आदी उपस्थित होते.