| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वारे केंद्रातील 15 जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी आणि कळंब येथील एकता हायस्कुल या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एकूण 850 विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
वारे केंद्रातील गिरेवाडी,उंबरवाडी,चिंचवाडी,वाघ्याचीवाडी,जांभुळवाडी,नवसुचीवाडी,हर्याचीवाडी,विकासवाडी,चाहुचीवाडी,देवपाडा,वारे,पोही,कुरुंग,पोशिर,चिकणपाडा,कळंब 16 शाळेंतील विद्यार्थ्यांना कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट अंधेरी या सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी खुशबू गोयल, जगदिश चौरसिया, अनिकेत गुप्ता, विशाल गुरव,राजेश बिंद, वारे केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख अशोक म्हसे, कळंब को.ए. सो.हायस्कूलचे चेअरमन हनुमान बदे,कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कृष्णा बदे, देवपाडा शाळेचे मुख्याध्यापक जाधव,को.ए.सो. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष देशमुख, ुख्याध्यापक मचिंद्र रढे,पोशिर शाळा मुख्याध्यापक रघुनाथ शेळके,गिरेवाडी शाळेचे शिक्षक वसंत ढोले,तसेच अन्य शाळांचे शिक्षक एकनाथ टेकडे,पंकज पवार,भारती तुपे,शिला बरसट,सुरेखा जगताप,माळी,पल्लवी म्हसे, सय्यद,संजय घरत,शिद,रवि राठोड,लहू शिनारे,अजय केंद्रे,जनार्दन निरगुडे,रविंद्र थोरात,अश्विनी थोरात,हरीष दहिफळे,श्याम चव्हाण,सुधाकर चव्हाण मानसिंग वसावे आदी शिक्षक उपस्थित होते.