अंगणवाडीतील बालकांना खाऊ वाटप

| नेरळ | प्रतिनिधी |
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत भाजप महिला मोर्चा यांच्या माध्यमातून पळसदरी येथील अंगणवाडीतील बालकांना खाऊ वाटप करण्यात आले. अंगणवाडीमधील आदिवासी आणि गरीब बालकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना दत्तक घेण्याचा निर्धार भाजप महिला मोर्चा यांच्याकडून जाहीर करण्यात आला.

दरम्यान, अंगणवाडी बालकांच्या समस्या भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी यांनी समजून घेतल्या. त्यावेळी महिला मोर्चाचे वतीने महिला तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे यांनी महिला मोर्चा अंगणवाडीमधील बालकांना दत्तक घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. त्यावेळी त्यांनी आदिवासी बालकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि अंगणवाडी दत्तक घेण्यातून मुलांना या उपक्रमातून चांगल्या सेवा मिळतील यात शंका नाही असा आशावाद यावेळी सनेहा गोगटे यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेविका स्वामीनी मांजरे, वर्षा बोराडे यांनी माहिती दिली. याप्रसंगी प्रीती तिवारी, सुषमा ढाकणे, शर्वरी कांबळे, स्मिता सविते, महिमा राजभर, रोहिणी उगले आदी उपस्थित होत्या.

Exit mobile version