| चिरनेर | प्रतिनिधी |
हाशिवरे येथील हितवर्धक मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववी मधील 50 गरजू मुलींना मंगळवारी (दि.24) भारतीय स्टेट बँक हाशिवरे शाखेच्या सी.एस.आर. फंडातून सायकलींचे वितरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील या शाळेतील मुलींना शाळेत ये- जा करण्यासाठी दररोजची पायपीट करावी लागत असे. हा मुलींना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी आदर्श पर्यावरण बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम राबविण्यात आला. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या कार्यक्रमासाठी भारतीय स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर विलास शिंदे, स्वप्निल तांबोळी, ज्ञानेश्वर जरारे, रविंद्र चिंध, आदित्य म्हात्रे, चिराग म्हात्रे, यांच्यासह बँकेचे अन्य कर्मचारी व हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या उपाध्यक्षा सरोज डाकी, सुबोध मोकल, निशिकांत मोकल, मुख्याध्यापक बी. डी. गायकवाड,पर्यवेक्षक प्रबळकर, शिक्षक, सर्व मुलींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







