रायगड पोलिसांना पावसाळा साहित्याचे वाटप

पोस्कॉ महाराष्ट्र स्टीलचा स्त्युत्य उपक्रम
। कोलाड । वार्ताहर ।
पोस्कॉ महाराष्ट्र स्टील यांना रायगड पोलिसांच्या कामाचा आदर आहे व त्यांच्या या कामाचा गौरव करण्यासाठी पोस्कोद्वारे रायगड पोलिसांना कोलाड, रोहा व अन्य ठिकाणी बॅरिकेट, स्टँडी फलक, वाहतूक नियंत्रक सुरक्षा दंड, फोल्डएबल खुर्च्या, टॉर्च, रेनकोट, फोल्डेबल मोठ्या छत्र्या, पाण्याचा बाटल्या, एन-95 मास्क व सॅनिटायझर इत्यादी वस्तू दान करण्यात आल्या.

कोव्हिड महामारी दरम्यान नागरिकांना सामाजिक अंतर पाळायला लावणे तसेच घरातच सुरक्षित राहण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम रायगड पोलीस करते आहे. रायगड पोलिस दिवस रात्र एक करून कोव्हिड-19 च्या विरोधातील लढ्यात महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्या कामाला सलाम करत पोस्कॉ महाराष्ट्र स्टील यांनी विविध वस्तूचे वाटप केले आहे.

Exit mobile version