। म्हसळा । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसळा तसेच रा.जि. प. शाळा आणि माध्यमिक शाळा नेवरूळ येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी रवींद्र लाड, सुरेश कुडेकर, राजाराम तिलटकर, विशाल सायकर, कौस्तुभ करडे, दिपल शिर्के, विलास खेडेकर, बाबू शिर्के, अंकुश नटे, सुमित्रा खेडेकर, नरेश विचारे, संतोष उद्धरकर, निशा पाटील, फहद पेनकर आदि मान्यवर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळाला.
म्हसळ्यात शालेय साहित्य वाटप
