| खांब | प्रतिनिधी |
गतवर्षापासून रोहा तालुक्यामध्ये अंगणवाडीमध्ये क्वेस्ट व महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यात पालवी प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत रोहा तालुक्यातील 21 मॉडेल अंगणवाडी सेविकां व सीडीपीडी तसेच सुपरवायझर यांना एमजीएल विद्या पालवी प्रकल्पामार्फत टॅब वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
अंगणवाडीपासून दिले जाणारे शिक्षण अधिक दर्जेदार असावे व बालवयापासूनच बालकांच्या बुद्धीमत्तेला चालना मिळावी तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने क्वेस्ट व महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यात पालवी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अंगणवाडी शिक्षणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तालुक्यातील मॉडेल अंगणवाडी सेविकांचे चौथ्या स्तराचे प्रशिक्षण व टॅब वितरण सोहळ्याचे आयोजन दि.14 व 15 ऑक्टो. रोजी करण्यात आले होते. यामध्ये 15 तारखेला रोहा तालुक्यातील 21 मॉडेल अंगणवाडी सेविकांना व सीडीपीडी व सुपरवायझर यांना एमजीएल विद्या पालवी प्रकल्पामार्फत टॅब वितरण करण्यात आले.
या टॅबचा उपयोग या मॉडेल अंगणवाडी सेविका त्यांच्या बीटमध्ये प्रशिक्षण देताना, पालकांच्या व्हिडिओवर व इतर सेविकांना कामात मदत करण्यासाठी करणार आहेत. हे टॅब दिल्यामुळे सेविकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. टॅब वितरणासाठी कार्यक्रम प्रसंगी तालुक्याच्या महिला व बालविकास अधिकारी शरयू शिंदे, पर्यवेक्षिका सुप्रिया भगत, भरती भाकरे, कल्पना नांदेकर, करिष्मा खाडे तसेच पालवी रोहा प्रकल्पाचे व्यवस्थापक नितीन मराडे, प्रकल्प प्रमुख भूषण पटारे हे उपस्थित होते. सोबतच पालवी प्रकल्पातील सर्व प्रकल्प समन्वयक व मॉडेल अंगणवाडी सेविकादेखील उपस्थित होत्या.





