| आपटा | प्रतिनिधी |
मोहपाडा येथील आरोपी महिलेने भिशीच्या नावाखाली अनेक ग्रामस्थांची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. संगणिका मानकामे असे आरोपी महिलेचे नाव असून, ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना पनवेल येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या घटनेचा अधिक तपास अप्पर पोलीस अधीक्षक विशाल नेहुल व रसायनीचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करीत आहेत. दरम्यान, या घटनेत आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याबाबत चौकशी करण्यात येत असून, नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन रसायनी पोलिसांनी केले आहे.







