| उरण | वार्ताहर |
कै. कमल्या हाल्या पाटील आणि गणा हाल्या पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून ओमकार सांस्कृतिक भजन मंडळ उरण पूर्व विभाग यांच्या सहकार्य व नियोजनातून रमेश बाळाराम पाटील व दिलीप कमळ्या पाटील यांच्या परिवारातर्फे वेश्वी येथे दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रायगड भूषण डी.आर. ठाकूर, अशोक बुवा पाटील, विलास बुवा मढवी, मोहन बुवा पाटील, सुरेश बुवा पाटील, विकास बुवा कडू, मोतीराम बुवा मढवी, गोवर्धन बुवा पाटील, जगदीश बुवा पाटील, दिगंबर बुवा कडू, मनीष बुवा मढंवी, राजुबुवा माळी, संदीप बुवा कडू, सोमनाथ नाईक, यश रसाळ आदींच्या भजनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा करणारे डॉ. अशोक शिंदे, डॉ. प्रकाश मेहता, डॉ. तेजस पाटील तसेच पंजाब येथे खेळण्यात येणाऱ्या बेसबॉल स्पर्धेसाठी अथर्व रमेश पाटीलची इंडियन मॉडल स्कूल उलवेमधून निवड झाली. त्याचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच विलास पाटील, सुनील तांबोळी, अजित पाटील, गीतांजली पाटील, शेकाप नेते मेघनाथ तांडेल, उद्योजक तेजाब म्हस्के, शिवसेना शाखाप्रमुख रवींद्र पाटील, ज्ञानदीप ग्रंथालय अध्यक्ष डी.एस. पाटील, पदाजी कडू, शशिकांत मुंबईकर, प्रभाकर मुंबईकर कृष्णा मुंबईकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन शाम ठाकूर यांनी केले, तर आभार रमेश पाटील यांनी मानले.