कंत्राटी नको नियमित करा

शिल्प निदेशकांचे नागपुरात बेमुदत आंदोलन

| माणगाव | प्रतिनिधी |

शासकीय सेवेत नियमित होण्याच्या मागणीकरिता गेली 12 वर्षे कंत्राटी सेवा करणारे आयटीआयचे कंत्राटी शिल्प निदेशक नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करून 21 डिसेंबरपासून उपोषणाला बसले आहेत. यासाठी राज्यातून कंत्राटी शिल्प निदेशक नागपूर येथे धडकले आहे.

रायगड जिल्ह्यातील 9 आयटीआयमधील 12 शिल्प निदेशकांसह महाष्ट्रातील विविध शासकीय आयटीआयमध्ये वेगवेगळ्या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्याना प्रशिक्षण देण्याकरिता गेली 12 वर्ष 309 शिल्प निदेशक तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. या मानधनातून या कंत्राटी निदेशकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत आहे. किंबहुना कुटुंबाची उपासमार होत आहे. गेली 12 वर्षे शासनाने सेवेत नियमित करण्यासाठी वेळोवेळी नुसती आश्‍वासने दिली. मात्र, याबाबत ठोस निर्णय घेतला नाही. सन 2011 पासून शिल्प निदेशक 15,000 रुपये एवढ्या मानधनावर आजपर्यंत काम करीत आहेत. महागाईच्या काळात हे मानधन परवडत नसल्याने त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असून, सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.

Exit mobile version