मुद्रांक विक्रेत्यांना सहाय्यकाची गरज काय?

सर्वसामान्यांची ओरड; दुय्यम निबंधकांचा कानाडोळा

। पेण । प्रतिनिधी ।

महसूल विभागाकडून सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून सुशिक्षित बेरोजगारांना मुद्रांक विकण्याचा परवाना देतो. पेणमध्ये तहसील कार्यालयाच्या आवारात एकूण सहा मुद्रांक विक्रेते आहेत. यामध्ये हबीब इब्राहिम खोत, प्रमोद हरी म्हात्रे, समीर प्रफुल्ल घोडींदे, राजेश नारायण पाटील, दिनेश मधुकर पाटील आणि प्रभाकर महादेव डंगर यांचा समावेश आहे. शासन ज्या वेळेला मुद्रांक विक्रेते म्हणून परवाना देते, त्यावेळेला या मंडळीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मुद्रांक विक्रीकरायची असते. परंतु, आजच्या घडीला या मुद्रांक विक्रेत्यांनी असा काही फंडा अवलंबलेला आहे की, यामध्ये काहींना तीन-तीन, चार-चार सहाय्यक आहेत, आणि असे सहाय्यक ठेवणे नियमानुसार चुकीचे आहे. या बाबीकडे दुय्यम निबंधक कानाडोळा करत आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, मुद्रांक विक्रेत्यांपेक्षा त्यांच्या सहाय्यकांकडूनच सर्वसामान्य जनतेला अरेरावीचे उत्तरे दिली जातात. त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाली आहे. आज सर्वसामान्य जनता कोणतेही काम घेउन तहसिल आवारातील मुद्रांक विक्रेत्यांकडे गेल्यास पहिल्यांदा या मुद्रांक विक्रेत्यांच्या सहाय्यकांकडून समोरच्या व्यक्तीची वेगळ्याप्रकारे कानउघाडणी केली जाते व अपमानास्पद वागणूक दिली जाते. नंतरच कामाचा विचार केला जातो. सर्वसामान्य जनता ही ग्रामणी भागातून आल्यामुळे त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे भले बडबडा पण आमचे काम करा, अशी स्थिती असते. आज प्रत्येक मुद्रांक विक्रेत्याला एक टेबल लावण्याची परमिशन असताना मुद्रांक विक्रेत्यांचे टेबल पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षनाने जाणवते ती म्हणजे दुय्यम निबंधक यांची मुद्रांक विक्रेत्यांवर मेहरनजर आहे.

आमचे प्रतिनिधी मुद्रांक विक्रेत्यांच्या टेबलचे छायाचित्र काढण्यास गेले असता, मुद्रांक विक्रेत्यांच्या सहाय्यकांनी आमच्याच प्रतिनिधींचे फोटो काढून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची खुलेआम दादागिरीच जणू काही या मुद्रांक विक्रेत्यांच्या सहाय्यकांची सुरू आहे.

Exit mobile version