नेरळमध्ये डॉक्टरांचा कँडल मार्च

कर्जत मेडिकल असोसिएशनकडून घटनेचा निषेध

| नेरळ | प्रतिनिधी |

कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून हल्ला करण्यात आला आहे. त्या हल्ल्यात ती डॉक्टर तरुणी मृत झाली. या घटनेचा निषेध शनिवारी कर्जत मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आला. कर्जत तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी दुपारी मेडिकल सुविधा बंद ठेवण्यात आली होती, तर कर्जत आणि नेरळ येथे कँडल मार्च काढून निषेध व्यक्त केला.

कर्जत मेडिकल असोसिएशनने महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, कर्जत शहरात दुपारी मोर्चा काढण्यात आला. तर, संध्याकाळी नेरळमध्ये कर्जत मेडिकल असोसिएशन आणि डॉ. फिजा तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली कँडल मार्च काढण्यात आला. नेरळ गावातील मारुती मंदिर येथून कँडल मार्चला सुरुवात झाली आणि माथेरान नेरळ मार्गाने रेल्वे स्टेशन येथे पोहोचला. त्यावेळी या मोर्चात कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अमित ओसवाल, उपाध्यक्ष डॉ मनीष परमार, खजिनदार डॉ. रितेश जैन यांच्यासह डॉ. भरतकुमार लाड, डॉ. श्रीकांत डहाके, डॉ. जैन, डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. शितुत, डॉ. महेश शिरसाट, डॉ. अडसूदेकर, डॉ. गणेश साळुंखे, डॉ. प्रशांत गांगल, डॉ. आशिष कर्वे, डॉ. गणेश साळुंखे आदींसह महिला डॉ. शर्वनी कुलकर्णी, डॉ. अदिती कर्वे, डॉ. सोनाली, डॉ. अमृता पाटील, डॉ. शिरसाट आदी उपस्थित होत्या. त्याचवेळी नेरळ येथील माजी सरपंच आयुब तांबोळी, धनाजी गरुड, सीमा गरुड, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष अ‍ॅड. रंजना धुळे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष आदेश धुळे यांच्यासह सम्राट युवक मंडळाचे अ‍ॅड. सम्यक सदावर्ते आदी सहभागी झाले होते.नेरळ पोलीस ठाणे येथे सर्व डॉक्टरांनी आपल्या मागणीचे निवेदन दिले.

Exit mobile version