| पनवेल | वार्ताहर |
पनवेलच्या एसटी डेपोमध्ये आरटीओ विभागाने कारवाई केलेल्या अनेक गाड्या एका बाजूला अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. या गाड्यांमुळे त्या ठिकाणी कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवाशांना नाक मुठीत घेऊन जावे लागते. त्याचप्रमाणे बसआगारात येणारे काही प्रवासी गाड्यांच्या आडोशाला आपला कार्यक्रम उरकून घेतात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. डासांचे प्रमाणाही वाढले आहे. एकीकडे स्वच्छता पंधरवडाच्या माध्यमातून स्वच्छतेचा गवगवा करणार्या पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.