बदली झाली तरी अंतर देवू नका – सुरेखा भणगे

। खोपोली । प्रतिनिधी ।
आपली बदली झाली असली तरी सर्वांसोबत स्नेहाचे नाते कायम राहणार असून खालापूरच्या लेकीला अंतर देवू नका असे भावनिक मत मावळत्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी निरोप समारंभ कार्यक्रमात व्यक्त करीत खालापुरात काम करताना लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पत्रकारांनी दिलेल्या पाठबळामुळे आपण चांगले काम करू शकलो असेही त्यांनी म्हणत सर्वांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचा निरोप समारंभ आणि नव्याने आलेल्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण यांचा स्वागत समारंभ खालापूरच्या नेताजी पालकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नायब तहसीलदार कल्याणी कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते, नगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेवक संतोष जंगम, आरोग्य अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा, लायन्स क्लब अध्यक्ष महेश राठी, शिवसेनेचे नविन घाटवळ, संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू पोटे, पत्रकार मनोज कळमकर, नगरसेविका कांचन गव्हाणकर, मंगला चाळके, खालापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र शहा आदी उपस्थित होते.

Exit mobile version