स्वतःचे पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नका- पंडित पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील साळाव पुलापासून ते बोर्ली पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम विनायक बिल्डर्सने केले आहे. बोर्लीमध्ये झालेला खराब रस्ता या ठेकेदारांमुळे झाला आहे. मात्र नागरिकांना संभ्रमात टाकून स्वतःचे पाप लपवून ठेवण्याचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. खराब रस्त्याचे खापर सुप्रभात कंपनीवर फोडू नका. स्वतःचे पाप दुसर्‍याच्या माथी लावण्याचा प्रयत्न करू नका अशी संतापजनक प्रतिक्रिया माजी आमदार पंडित पाटील यांनी दिली आहे. अलिबाग – मुरुड रस्त्याच्या 40 किमी कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी काही वर्षापूर्वी मंजूर झाला होता. बोर्लीपासून आगरदांड्यापर्यंत वेगवेगळ्या ठेकेदाराला टप्प्याटप्प्याचे काम दिले होते. त्यात 17 किमीचे काम सुप्रभात कंपनीकडे सोपविले होते. सुप्रभात कंपनीने मे 2022 मध्ये काम पूर्ण केले होते. शासनाकडून काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रदेखील प्राप्त झाले आहे. साळाव पुल ते बोर्ली पूलपर्यंतचा रस्ता विनायक रोड बिल्डरकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याला जबाबदार नसताना शिंदे गटाकडून नागरिकांना संभ्रमात टाकून स्वतःचे पाप लपविण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. असा आरोपही पंडित पाटील यांनी केला आहे.

ठेकेदाराकडून कामास विलंब
स्वतःच्या ठेकेदाराने केलेली चुक झाकून ठेवण्यासाठी विद्यमान आमदारांनी खड्डे बुजविण्यासाठी निधी दिला होता. आता शासनाकडून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा ठेका एप्रिल 2023 मध्ये शिंदे गटाचे ठेकेदार धनेश तांबडकर यांना मिळाला आहे. चार महिने होत आले तरीही शिंदे गटाच्या आमदारांच्या ठेकेदाराकडून काम सुरु करण्यात आला नाही. स्वतः केलेले पाप दुसर्‍यावर टाकण्याचा प्रयत्न करू नका. खराब रस्त्याचे खापर सुप्रभात कंपनीवर फोडण्याचा प्रयत्नही करू नका, असा इशारा माजी आमदार पंडित पाटील यांनी दिला.


Exit mobile version