| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 24 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 1 जूनपासून नवीन दर लागू झाले आहेत. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1 जूनपासून 1723.50 रुपये आहे. घरगुती एलपीजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. एप्रिलमध्ये, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1,762 रूपयांपर्यंत कमी करण्यात आली. फेब्रुवारीमध्येही किंमती 7 रूपयांनी कमी करण्यात आल्या होत्या, परंतु मार्चमध्ये पुन्हा 6 रूपये वाढवण्यात आले. नवीन किंमत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतरांसह लहान व्यवसायांसाठी दिलासादायक आहे.