‘लम्पी’ला प्रतिबंधाचा डोस

जिल्ह्यात 77 हजार 246 जनावरांचे लसीकरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

लम्पी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गीय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 77 हजार 246 गोवंश पशुधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दिली आहे.

लम्पी स्कीन हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. मात्र, हा आजार जनावरांपासून माणसांना होत नाही. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. हा आजार गोवांशिय पशुधनात जास्त प्रमाणात आढळतो. या आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे.

जिल्हह्याची सद्यःस्थिती

पशुधनात लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय चिकित्सालय किंवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यात गोवंश वर्गीय पशुधनाचे 100 टक्के लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गावात लसीकरण मोहीम सुरू असताना ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. किरण पाटील
सीईओ, जिल्हा परिषद
Exit mobile version