विंधणेतील महिलेच्या मृत्यूबाबत साशंकता

। जेएनपीटी । वार्ताहर ।
विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पार्वती किसन पाटील यांच्या मृत्यूबाबत आता साशंकता व्यक्त केली जात आहे.त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या करण्यात आली याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.

विंधणे येथील घरातील लादीवर पार्वती पाटील यांचा शुक्रवार सकाळी 7-30 च्या सुमारास मृतदेह आढळून आला. ही महिला घरात एकटीच राहत होती.तिच्या राहत्या घरी दोन महिन्यांपूर्वी घरातील दरवाजाची कडी तोडून तसेच कपाट तोडून घरातील टीव्ही, पैसे, दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर दरवाजे उघडे असल्याचे तसेच पार्वती पाटील यांचा मृतदेह घरातील लादीवर पडल्याचे दिसून आले.

याबाबत पनवेल येथे राहणार्‍या मुलाने आईच्या अंगावरील दागिने,कपाटातील पैसे चोरीस गेल्याची माहिती उरण पोलिसांना दिली. पार्वती पाटील यांचा मुलगा मदन पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरात या अगोदर ही दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती आणि आता पुन्हा चोरीची घटना घडून आईचा मृतदेह घरात आढळून आला आहे.

Exit mobile version