| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघात आयसीसी टी-20 च्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सूर्यकुमारलाही जागा मिळाली आहे. अशातच सूर्यकुमार यादवचं विश्वचषक खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. परंतु, सूर्यकुमार टी-20 मध्ये नंबर वन असला, तरीही त्याला एक दिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा सूर गवसलेला नाहीय.त्यामुळे त्याची निवड कशासाठी केली याबाबत क्रिकेटविश्वात उलटसुलट चर्चा सुरु झालेली आहे.
सूर्यकुमारची वनडे क्रिकेटमधील एकूण कामगिरीही चांगली नाहीय. त्याने आतापर्यंत 26 सामने खेळले आहेत. यामध्ये फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षीचा सूर्यकुमारची कामगिरी पाहिली तर, 10 एक दिवसीय सामन्यात त्याची सरासरी खूप खराब आहे. तसंच यावर्षी सूर्याच्या नावावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा डक आऊट होण्याचा लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला आहे. अशी कामगिरी असतानाही सूर्यकुमारला संघात जागा मिळाली आहे.असे असताना निवड समितीने त्याला कोणत्या निकषावर संघात घेतले अशी विचारणा आता क्रिकेट विश्वातून केली जात आहे.