डॉ. अरुंधती जाधव यांचे निधन

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील मांडवा लायन्स क्लबचे पदाधिकारी अनिल जाधव यांच्या पत्नी डॉ. अरुंधती जाधव यांचे शनिवार, दि. 21 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता चोंढी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर चोंढी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, आरडीसी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, अनिल म्हात्रे, श्री. वनगे-अलिबाग एव्हरग्रीन इलेक्ट्रॉनिक, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तसेच अलिबाग व मांडवा लायन्स क्लबचे पदाधिकारी, वैद्यकीय, राजकीय व सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांसह चोंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगी, जावई, असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी होणार आहेत, तर तेरावे बुधवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी चोंढी येथील राहत्या घरी होणार आहेत.

Exit mobile version