। अलिबाग । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब मांडवा, ट्रु डायग्नो लॅब चोंढी व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच चोंढी आणि सारळ येथे पार पडले. प्रत्येकी 2 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही शिबिरात एकूण 207 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणीत इसीजी, रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, हार्ट रेट, ऑक्सिजन तपासणी माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आहार व व्यायाम विषयक मार्गदर्शन, इतर रक्त तपासण्या करण्यात आल्या. चोंढी येथील शिबिरात 120 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, सारळ येथील शिबिरात 87 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या दोन्ही शिबिरासाठी लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, मांडवाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, प्रदीप पाटील, अमित नाईक, समता राऊत, सुबोध राऊत यांच्यासह इतर मान्यवरांची सक्रिय उपस्थिती होती.