। अलिबाग । वार्ताहर ।
शिक्षक भारती रायगडच्या माध्यमातून रविवारी (दि.9) आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच राष्ट्र सेवा दल शाखा रायगडच्या वतीने सामाजिक पुरस्कार सोहळा मा.आ. कपिल पाटील यांच्या हस्ते कर्जत येथे संपन्न झाला.
यावेळी पांडुरंग पुनकर, हरिश्चंद्र पाटील, सचिन गोडीवले, कृष्णा पाटील, जयसिंग बेटकर, प्रदीप थुल, विठोबा रेणोसे, संतोष घोडविंदे, अजित जोशी, मच्छिंद्र खेमनर, सचिन कदम, ज्ञानेश्वर मुंगळे, रुपेश पवार, नम्रता बडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्या आले. जयश्री नाईक, पंढरीनाथ म्हात्रे, रामचंद्र कोळी, मिलिंद पालवणकर, संतोष देशमुख, प्रशांत कोळी, दीपा देशमुख, रोहीणी देशमुख, मिताली मोरे, प्रमिला भौड, तेजश्री बोर्ले, सुजित नगरकर, सारिका सकपाळ व मिनाक्षी फराडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, गजानन मोरे, सतिष नलावडे, मन्सूर पानसरे, महेश शिर्के, निलेश तुरे, संध्या ठाकुर, दिनेश कडव, अभिजीत लाड, शर्मिला गावंड, जितेंद्र जाधव, राजु पार्टे, प्रदीप सावंत व नितेश बेडेकर यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे, गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड, राज्य उपाध्यक्ष विनोद कडव आणि किशोर कुमावत, राज्य प्रवक्ते सतिष हुले, जिल्हाध्यक्ष दिपक पाटील, मंदार रसाळ यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी, प्रतिनिधी उपस्थित होते.