अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिशनच्या अध्यक्षपदी डॉ.गणेश गवळी

| अलिबाग | प्रतिनिधी |
वैद्यकीय क्षेत्रात त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अलिबाग येथील समाज सेवक डॉ. गणेश गवळी यांची निवड करण्यात आली आहे.

अलिबागमधील म्यापल आवी हॉटेलमध्ये कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. महेंद्र दोषी, डॉ. संदेश पाटील, डॉ. आशिष भगत, डॉ. मकरंद आठवले, डॉ. अनघा भगत, डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. मयूर कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी डॉ. गणेश गवळी यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी यांनी डॉ. गणेश गवळी यांना पदभार सुपूर्द केला.

अलिबाग मुरूड मेडिकल असोसिएशनच्या वतीने चालू वर्षात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्याविषयी जनजागृती, त्याचबरोबर आपत्कालीन वेळेत जनेतेची मदत करणे व संस्थेच्या प्रत्येक सदस्याच्या जन्म दिवशी प्रत्येकी पाच अशी वर्षाला 1000 वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला असून, सामाजिक उपक्रमांनादेखील प्राधान्य देण्याबरोबरच असोसिएशनच्या सदस्यांसाठी वैद्यकीय व्याख्याने व स्पोर्ट्स डे साजरा करण्यात येणार असल्याचा मानस डॉ. गणेश गवळी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

यावेळी नवीन कार्यकारिणी सचिवपदी डॉ. प्रणाली पाटील, उपाध्यक्षपदी डॉ. संजय पाटील व डॉ. सुनीता पाटील, खजिनदार डॉ. अमित बेनकर व डॉ. रेखा म्हात्रे, विश्‍वस्त डॉ. राजाराम हुलवन, डॉ. उज्वल जैन, डॉ. वसीम पेशिमान, डॉ. अमेय केळकर, डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ. सुबोध पाटील, डॉ. जुईली टेमकर, डॉ. समीर धटावकर, डॉ. ओमकार पाटील, डॉ. मनीष म्हात्रे, डॉ. सोनाली नाईक, डॉ. निशिगंध आठवले यांची निवड करण्यात आली आहे.

इंडियन मेडिकल अलिबाग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदेश पात्रे यांनी डॉ. गणेश गवळी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ दिल्या.

Exit mobile version