डॉ. किरण नाबर यांचे व्याख्यान

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी |

शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र, अलिबागच्या वतीने रविवार (23) श्रीबाग येथील श्रीमती भारती दीनानाथ तरे सभागृहात त्वचारोगज्ज्ञ डॉ. किरण नाबर यांचे अ‍ॅलर्जीमुळे होणारे त्वचाविकार याबाबत व्याख्यान आणि त्वचारोग तपासणीचे आयोजन करण्यात आले. यावेळी 60 ज्येष्ठांनी व्याख्यानाचा लाभ करुन घेतला आणि आपली त्वचारोग तपासणीही करुन घेतली.
डॉ. किरण नाबर यांनी अ‍ॅलर्जी कशामुळे होते याची माहिती स्लाईड शोद्वारे करुन दिली. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे, सहसचिव प्रफुल्ल राऊत, जगदीश थळे, भारती दीनानाथ तरे, अ‍ॅड. मनोज पडते यांनी मेहनत घेतली. या शिबिरासाठी डॉ. प्रशांत जन्नावार, डॉ. सुरेश म्हात्रे, डी.डी. नाईक, गजेंद्र दळी, श्रीरंग घरत, उमाजी केळुसकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रफुल्ल राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version