| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहरात पावसाळ्यात नाले-गटारे तुंबून पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता खोपोली पालिका आरोग्य व बांधकाम विभाग अंतर्गत कृती आराखडा तयार करून विविध प्रभागातील लहान-मोठी गटारे नाले, सफाईचे काम दरवर्षी हाती घेतले जाते. मे महिना काही दिवसांनी संपणार असून, पाऊस कधीही सुरू होण्याची परिस्थिती असतानाही शिलफाटा पटेल नगर भागासह शहरात ठीक-ठिकाणी गटार व नालेसफाईचे काम अद्माप सुरू नसल्यामुळे यंदाच्या पावसात खोपोली तुंबळ्यावर लोकप्रतिनिधी धावणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारात आहेत. मात्र, पटेल नगर भागात पाहणी करून नागरिकांची दिशाभूल करण्याची मोहीम पालिकेने व लोकप्रतिनिधी नी हाती घेतल्याची चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
शहरातील भानवज-शास्त्रीय नगर येथून येणाऱ्या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विनानगर परिसर, शिळफाटा येथील डिसी नगर आदी भागांमध्ये पावसाचे पाणी सखळ भागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. तसेच प्रत्येक प्रभागातील मुख्य गटारांमधील आडकलेला कचरा काढणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षापासून पाऊस लवकर हजेरी लावलो त्यामुळे पालिकेने शहरातील नालेसफाई आणि गटारे सफाईची करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
खोपोली शिळफाटा परिसरातील पटेल नगर भागात सर्व धर्मीय लोक वास्तव्यात आहेत. याठिकाणी छोटे मोठे व्यवसाय आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने येथील गटारांची सफाई करणे गरजेचे आहे. येथील गटारे तुंबली आहेत, त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वशिद रजपूत







