केलटे येथे वन्यजीव सप्ताह सपन्न

। म्हसळा । वार्ताहर ।
रोहा वनविभागातील म्हसळा वनक्षेत्रातील कोंझरी परिमंडळ मधील संयुक्त वनव्यास्थापन समिती केलटे आणि कोळे येथे रोहा वनविभागाचे उपवन संरक्षक आप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक जाधव, वनक्षेत्रपल निलेश पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली वन्यजीव चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
पी. एन. पी. माध्यमिक विद्यालय केलटे आणि न्यू इंग्लिश स्कूल कोळे येथे घेण्यात आलेल्या वन्यजीव चित्रकला स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन आणि शाळेपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्क्रमास परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक, गणेश बोर्ले, दिलीप वाघे, भीमराव सूर्यतळ,अतुल अहिरे, किरण पालांडे, महेंद्र विचारे,डिंगणकर, राजेंद्र मोहिते,अनिल चाळके, दर्गे मॅडम, कदम सर आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version