| मुंबई | प्रतिनिधी |
विमानतळाच्या आत असलेल्या जुन्या एअर इंडिया हँगरच्या टॅक्सीवेजवळ ड्रोन सापडल्याने एकच खळबळ उडाली. विमानतळ परिसरात कोणत्याही प्रकारचा ड्रोन किंवा रिमोट कंट्रोल विमान उडवण्यास सक्त मनाई आहे. दरम्यान, ड्रोन सापडताच तात्काळ पोलिसांनी विमानतळ आणि आजूबाजूच्या रहिवासी परिसराची तपासणी केली. मात्र, ड्रोन ऑपरेटरचा छडा लागू शकला नाही. ड्रोन जप्त करून तपास करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.