। मुंबई । प्रतिनिधी ।
एनसीबीने सोमवारी सकाळी मुंबईला परतलेल्या क्रूझची झडती घेतली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकार्यांनी आणखी ड्रग्स जप्त करण्यात आले असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या घटनेचे पडसाद रविवारी दिवसभर उमटल्याचं दिसून आलं. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना एनसीबीने अटक केली. एनसीबीच्या अधिकार्यांनी पुन्हा त्या क्रूझवर जाऊन तपासणी सुरु केली आहे. यानंतर आता आणखी आणखी आठ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रविवारच्या तपासानंतर एनसीबीचे हेच धाडसत्र सोमवारी पहाटेही सुरु होतं. याच प्रकरणासंदर्भात मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत अमली पदार्थ पुरवणार्याला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणार्याला ताब्यात घेण्यात आले. आता अमली पदार्थ पुरवणार्यांना ताब्यात घेण्यात आल्याने कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अमली पदार्थ पुरवले जातात यासंदर्भातील पुरवठा साखळी आणि इतर महत्वाची माहिती एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.