। संतोष पाटील । पेण ।
पेण तालुक्यातील कट्टर शेतकरी कामगार पक्षाची ग्रामपंचायत म्हणून रोडे ग्रामपंचायतीची ओळख आहे. रोडेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली 10 वर्षे लाल ब्रिगेड तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रोडे ग्रामपंचायतमध्ये शेकापचा लाल बावटा फडकत आहे.
यावर्षी शेकापची हॅट्रिक पुर्ण होणार असे ठाम मत रोडे ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाची चौरंगी रंगत आहे. शेकाप व ठाकरे गटाकडू दिनेश हनुमंत पवार हे उमेदवार निवडणूक लढवत आहे. दिनेश पवार हे उच्च शिक्षित असून राजकारणात हिरहिरीने भाग घेणारे, युवा नेतृत्व आहे. त्यांच्याविरोधात शिंदे गट, कॉगे्रस आणि अपक्ष निवडणूक लढवित आहेत. या चौरंगी लढतीमध्ये शेकापचे दिनेश पवार हे निर्विवाद निवडून येणार असल्याचे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले. तसेच प्रभाग क्र. 1 मध्ये शांती पवार, जयश्री गोरे, रामकृष्ण वाघमारे. प्रभाग क्र. 2 मध्ये अस्मिता म्हात्रे, दिनेश पाटील. प्रभाग क्र. 3 मध्ये नरेश सोनावणे, सुनिता वाघमारे असे शेकाप-शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.

येत्या रविवारी (दि.18) मतदान होणार असून सध्या सर्वच कार्यकर्ते प्रचाराचा धुरळा उडवित आहेत. घराघरात प्रचार सुरु आहे. प्रचाराची पद्धत पाहता शेकापचे उमेदवार पॅनल टू पॅनल निवडून येणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. फेव्रुवारी महिन्यात आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते रोडे ग्रामपंचायत हद्दीत दिड कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे गावाचा चेहरा मोहराच बदलला आहे. गेल्या दहा वर्षातील पहिली पाच वर्षे स्वप्निल म्हात्रे, नंतरचे पाच वर्षे संगीता सोनावणे यांनी सरपंच पदाचा कार्यकाळ यशस्वीपणे पुर्ण करून गावात विकासकामे केली आहेत. तसेच पुढच्या पाच वर्षासाठी प्रस्तावित कामे देखील मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे दिनेश हनुमंत पवार हे सरपंच तर अन्य सदस्य देखील निवडून येतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे
मागील ५ वर्षातकेलेली विकासकामे
- वाशी नाका ते रोडे गावापर्यत डांबरी रस्ता.
- रोडे गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रिट.
- काश्मिरे ते शहापाडा धरणापर्यत डांबरी रस्ता.
- स्मशानभूमीचे काम.
- रोडे गावाकडून आदिवासी वाडीकडे जाणारा रस्ता.
- धनगरवाडी, तळवाडी येथे विजेची लाईन.
- फणसवाडी येथे स्मशान भूमी, सार्वजनिक शौचालय, व्यायाम शाळा इ. कामे.
- कोळीवाड्यासाठी नवीन सिध्दिविनायक मंदिर बांधणे.
- बौद्धवाडी येथे स्मशानभूमी, शौचालय, घरोघरी नळ योजना, सिमेंट कॉक्रिट रस्ता.
- ग्रामपंचायत कार्यालयाची दुरूस्ती.

नियोजित कामे
- कब्रस्थानसाठी संरक्षण भिंत.
- कब्रस्थानवरील अतीक्रमण हटवून मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेसाठी (नमाजासाठी) जागा उपलब्ध करणे.
- कब्रस्थानची भ्रष्टाचार करून विक्री केलेली जागा मुस्लिम बांधवांना परत देणे.
- मोहल्ल्यासाठी नविन सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता तयार करणे.
- रोडे गावामध्ये नवीन सुसज्ज व्यायाम शाळा बांधणे.
- रोडे गावासाठी प्राथमिक उपआरोग्य केंद्र बांधणे.
रोडे गावात इतर राजकीय पक्षांचा विकासकामांमध्ये सहभाग शून्य असल्याने रोडे ग्रामस्थ निर्विवाद शेकाप-शिवसेना ठाकरे गटाच्या पॅनलला निवडून देतील, यामध्ये मला तीळमात्र शंका नाही. वर्षभर निद्रावस्थेत असलेले जे पुढारी निवडणूका आल्यानंतर भूछत्रीप्रमाणे उगवतात, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. जनता आम्हाला का स्वीकारते तर आम्ही जनतेच्या सुख-दुखा:साठी, जनतेच्या अडचणीच्या काळात आणि विकासकामांसाठी 24 तास उपलब्ध असतो. – स्वप्निल म्हात्रे, पेण तालुका लाल ब्रिगेड अध्यक्ष तथा माजी सरपंच रोडे