पोलिसांच्या सतर्कमुळे दाम्पत्याला जीवदान

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेलजवळील फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नलजवळून जात असलेल्या एका टँकरखाली रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटर सायकलवरील दाम्पत्य आले होते. परंतु तेथे कर्तव्यावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सतर्कमुळे त्या दोघांना जीवदान मिळाले.

फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल यंत्रणा विद्युत पुरवठाअभावी बंद होती. त्यामुळे त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोहन मुळीक, प्रकाश भोरे, रवींद्र मोरे, निलेश लांगरे हे होते. दरम्यान, एक टँकर त्या ठिकाणावरून जात असताना रस्तावरील खड्डे वाचवण्याच्या नादात दुचाकीवर असलेले दाम्पत्य टँकरखाली आले. हा अपघात झाल्याचे बघताच त्यांचा जीव वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी धाव घेतली व टँकरला थांबवून दोघांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी महिलेला किरकोळ दुखापत झाली. तसेच जीव बचावल्याचे पाहून या दाम्पत्याने कळंबोली वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे आभार मानले.

Exit mobile version