पेणमधील आरक्षणामुळे इच्छुकांची धाकधूक

। पेण । वार्ताहर ।
पेण नगरपालिकेत 12 प्रभागामध्ये 24 जागांचे आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग क्र.1 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.2 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.3 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.4 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.5 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.6 अ महिला खुली तर ब अनुसुचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्र.7 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.8 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.9 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.10 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 11 अ महिला खुली तर ब अनुसुचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग क्र.12 अ महिला खुली तर ब सर्वसाधारण असे असून यामध्ये सर्व साधारण 10, महिला 12, अनुसुचित जाती सर्वसाधारण 1, अनुसुचित जमाती सर्वसाधारण 1 अशा एकूण 24 आरक्षण जाहीर झाले आहे.
पेण नगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागातील आरक्षणाची सोरट काढण्यात आली. या सोरटीसाठी मुख्यअधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी जीवन पाटील, प्रशासन अधिकारी राजाराम नरूटे, नगरपालिका कर्मचारी, तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 15 जून ते 21 जून या कालावधीत हरकती अथवा सुचना दाखल करता येतील अशी माहिती यावेळी प्रशासकीय अधिकार्‍यांकडून करण्यात आली.

Exit mobile version