लोहोप जवळ डंपरने ॲक्टिव्हा उडवले; एक ठार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भरधाव डंपरने ॲक्टिव्हाला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात एक ठार झाल्याचे वृत्त आहे. खालापूर तालुक्यातील लोहोप येथे हा अपघात झाला. याबाबतचे वृत्त असे की, लोहोप जवळ डंपर वाल्याने एक्टिवाल्याला उडवले.

हा अपघात इतका भयंकर होता की त्याच्यामध्ये डंपर पलटी झाला. ऍक्टिवावर दोघ जण होते असे समजले एकाचा मृतदेह सापडला असून. दुसऱ्याच्या मृतदेहाचा पोलिस आणि स्थानिक शोध घेत आहेत. सदर मृतदेह डंपरच्या खाली अडकलेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रसायनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बलवाडकर घटना स्थळी हजर झाले आहेत.

Exit mobile version