ठाकूरवाडी शाळेसाठी ई-लर्निंग किट

। रोहा । वार्ताहर ।

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब रोहा सेंट्रल कडून तालुक्यातील राजिपच्या निवी ठाकूरवाडी शाळेला ई-लर्निंग किट भेट देण्यात आले. या संचाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र परशुराम नाकती यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक तथा क्लबचे अध्यक्ष रामचंद्र नाकती व बिल्डर रोटरियन राकेश मोरे यांच्याकडून प्रत्येकी शाळेला दोन वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. किरण धनवी यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सचिव विजय दिवकर, खजिनदार राकेश कागडा, किरण धनवी, मुख्याध्यापिका सानिया पठाण, सरिता राठोड, शाळेय शिक्षण कमिटी, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version