| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील तिलोरे व सुधागड तालुक्यातील महागाव या ठिकाणी गुरुवारी (दि.20) पहाटेच्या सुमारास भुकंपाचे सौम्य हादरे बसले आहेत. नागरिकांना जाणीव होताच त्यांनी तात्काळ याबाबत तहसीलदारांना कळविले.
सुधागड व पेण तालुक्यात ग्रामीण भागात रात्री भुकंपाचे हादरे बसल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या धक्क्याने कोणतेही नुकसान झाले नाही.
सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड