| नेरळ | वार्ताहर |
उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शाडूच्या माती हातात घेऊन बाप्पांची निर्मिती केली. विद्यार्थ्यांनी घडवलेल्या बाप्पांची काही पालक आपल्या घरी गणेशोत्सवात प्रतिष्ठापना देखील करणार आहेत.
सुंदर कलाकृती घडवाव्यात यासाठी शाळेचे मुख्यध्यापक रवी काजळे यांनी विद्यार्थ्यांच्या हातात शाडूच्या मातीचे गोळे दिले. दिवसेंदिवस पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे, त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे, हे लक्षात घेऊन झुगरेवाडी शाळेत कार्यरत असलेल्या विद्यार्थी पर्यावरण क्लबच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक तब्बल 80 गणेश मूर्ती आपल्या हातांनी घडविण्याच्या प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नंदादीप चोपडे, रवी काजळे आणि शिक्षक उपस्थित होते. गणेश चतुर्थीचे दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्ती यांमधून सर्वोत्कष्ट पहिले तीन क्रमांक काढले जाणार आहेत.