| मुंबई | प्रतिनिधी |
ठाकरे गटाचे आ.रवींद्र वायकर यांच्यावर झालेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपाप्रकरणी आज चौकशी झाली. गुन्हे शाखेने तब्बल पाच तास चौकशी केल्यानंतर वायकर बाहेर पडले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना वायकरांनी खालच्या भाषेत किरीट सोमय्या यांच्यावर टिपण्णी केली. महानगर पालिकेच्या जागेवर हॉटेल बांधल्याचा रवींद्र वायकर यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणी भाजप नेते तथा खासदार किरीट सोमय्या यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केलेली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये वायकर यांनी हा मुद्दा उपस्थित करुन जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा ठपका ठेवला होता. मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.