| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबईचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा-रायगड संस्थेत शैक्षणिक-व्यवसाय कर्ज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मौलाना अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्याक आयोगाचे कर्मचारी रुपेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना विविध योजना विषयी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्याना शिक्षणासाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांच्या माध्यमातून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेता येईल याची माहिती दिली. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना, मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना, मुदत ठेव योजना, शुक्ष्म पतपुरवठा योजना आणि बचतगट कर्ज योजना या सारख्या अनेक योजना विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून याचा आपल्या पुढील जीवनात फायदा करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना 70 विद्यार्थ्यांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मौलाना अब्दुल कलम आझाद अल्पसंख्याक आयोगाचे कर्मचारी रुपेश मोरे, फझल हळदे, प्रभारी प्राचार्य प्रा.दिगंबर टेकळे, एम.एस.जाधव, प्रा.एस.सी.समेळ, प्रा.एस.यु.बेंद्रे आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धिकी यांनी केले तर आभार प्रा.फहीम मन्सुरी यांनी केले.