दरोडा टाकण्यासाठी आलेल्या आठ जणांना अटक

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल येथे एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्या करता आलेल्या आठ जणांना गुन्हे शाखा कक्ष 2ने अटक केली आहे. बच्चा महावीर महातो, मुनीलाल कुमार कश्णा महातो, नवीन इंदर पासवान, नरेशकुमार रामबाबु सहाणी, सुनिल बांधा स्वामी, भदाई हिरामण सहाणी, आवधेश लालजी पासवान, मोहम्मद रिवान मोहम्मद नन्ने अशी या आरोपींची नावे आहेत.

पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स जवळील रस्त्यावर एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याकरता दरोडेखोर एकत्र येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 ला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरधर गोरे व त्यांच्या पथकाने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी परिसरात सापळा रचला. यावेळी रिक्षेतून आठ इसम रिक्षेतून त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी एटीएममध्ये कसा प्रवेश करायचा व कोणी अडथळा आणल्यास काय करायचे याबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने या आठही दरोडेखोरांना घेराव घातला. व त्यांना पळून जाताना अटक केली. त्यांच्याकडे लोखंडी कटावणी, चाकू, लोखंडी मूठ, मिरची पूड व वेगवेगळ्या बँकांचे 89 कार्ड सापडले आहेत.

Exit mobile version