| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आले आहे. शनिवार रात्री 10.30 ते रविवार सकाळी 8.30 या कालावधीत हे रुग्ण दगावले आहेत. त्यातील 15 रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर 3 रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. या वृत्तास रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. यावरुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र हे सर्वजण विविध आजारांनी उपचार घेत असताना मयत झाल्याचे म्हटले आहे. आरोग्य मंत्री तानाजी चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिलेले आहेत.