बंदी आदेश शिथील
। महाड । वार्ताहर ।
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) आणि म्हाप्रळ -पंढरपूर मार्गाववरील वरंध घाट वाहतुकीवर निर्बंध लावण्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली होती. परंतु सद्य परिस्थिनुरूप नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सदर आदेश शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या घाट मार्गवरील वाहतूक सुरू होणार आहे.
आंबेनळी घाट हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकार्यांनी दिले होते. जुलै महिन्यात अतिवृष्टीच्या काळात दरड कोसळल्याने चारवेळा घाट बंद झाला होता या मार्गावर पावसाचे प्रमाण व घाटामध्ये दरडीची टांगती तलवार लक्षात घेता आंबेनळी घाट हा सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी पुढील 15 दिवसांकरीता बंद करण्यात आला होता. मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले असून गेल्या 15 दिवसात घाट अनुचित नैसर्गिक आपत्ती ओढावली नाही वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने अनेक प्रवासी वर्गाला द्राविडी वळसा घालत प्रवास करावा लागत होता.वरंध घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मार्गावरील घाटात दरड कोसळण्याचा घटनेमुळे जिल्ह्यात हद्दीत आदेश देण्यात आल्याने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या दोन्ही अधिसूचना पुढील आदेशापर्यंत शिथिल करण्यात आल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.