। अलिबाग । प्रतिनिधी ।
सहकार भारतीचे 14 वे त्रैवार्षिक अधिवेशन दि.21 व 22 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे संपन्न झाले. या अधिवेशनात रविवारी (दि.22) सहकार भारतीच्या सन 2024 ते 2027 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रदेश अध्यक्षपदी दत्ताराम चाळके आणि प्रदेश महामंत्रीपदी विवेक जुगादे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर प्रदेश स्तरावरील नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. यात सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ यांची प्रदेश कोषाध्यक्षपदी फेरनिवड झाली. तसेच, सांगली अर्बन बँकेच्या संचालिका अश्विनी आठवले यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी जाहीर केले.
यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, माजी प्रदेश अध्यक्षा शशीताई अहिरे, प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, जनता सहकारी बँक पुणेचे अभय माटे आदी मान्यवर तसेच राज्यभरातून विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.