। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील जे.बी.सावंत एजुकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालयात गुरूवारी (दि.26) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच माहिती तंत्रज्ञान सहाय्यक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा आयोजित विध्यार्थी संवाद उपक्रम घेण्यात आला. यावेळी 90 विध्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र मुंबईचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधताना मोबाईलचा वापर चांगल्या पुस्तकांच्या वाचनासाठी करावा, असे आवाहन केले. पालकांशी असणारा संवाद दिवसेंदिवस कमी होत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य हर्षल जोशी यांनी करिअर कट्ट्याच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व उद्योजक आपल्या भेटीला तसेच छोटे छोटे कोर्सेस या उपक्रमांतर्गत सुरु असून त्याचा फायदा विध्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रा.अशोक मोरे तालुका समन्वयक यांनी केले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा समन्वयक डॉ.बबन शिनगारे, डॉ. शिगवण, डॉ. नितीन मुटकुळे, अमित बाकाडे, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.