। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या देवतांच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यासाठी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे पदाधिकारी, उत्सव समिती व ग्रामस्थ यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाला गुरुवार दि.3 ऑक्टोबर रोजी प्रारंभ होणार असून 11 ऑक्टोबरपर्यंत चालणार्या या नवरात्रोत्सवात दररोज सायंकाळी महाआरती, हरिपाठ, रास गरबा, भजन, श्री दुर्गामाता सप्तशती पाठ, भोंडला नृत्य, संगीतमय कार्यक्रम, हळदी कुंकू, बासरी वादन तसेच रोज रात्री साडेनऊ वाजता पनवेल येथील कीर्तनकार श्रीराम चितळे यांचे कीर्तन होणार आहे. याचबरोबरच विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नऊ दिवस करण्यात आले आहे. यावेळी देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव भाई टके, जयराम पवार, हरेश काळे, बाळासाहेब टके, बाळाराम पोटे, विठ्ठलतात्या खंडागळे, सुनील लाड, अनिल नागोठणेकर, सुरेश गिजे, दिनेश घाग, समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, रुपेश नागोठणेकर, मंगेश कामथे, संजय नांगरे, प्रथमेश काळे, सुदर्शन कोटकर आदींसह विश्वस्त समिती व उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.