महिला उद्योग समिती सदस्यांची निवड

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा महिला सहकारी उद्योग समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत रोह्याच्या माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा काफरे यांची बिनविरोध निवड झाली.

उर्वरित 10 जागांसाठी एकूण 18 उमेदवार रिंगणात होते. मतदानानंतर झालेल्या मतमोजणी मध्ये राजश्री देसाई (56), उषा क्षीरसागर (55), नेहा कुळकर्णी (51), शितल डफळ (49), निता हजारे (47), नूतन सिन्हा (47), विजया कोठारी (46), मनोलू गुरव (45), समीक्षा बामणे (44) तर ज्योती सनलकुमार (44) याप्रमाणे मते मिळवून विजयी झाल्या आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे रोहा शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version