एम्मा मॅकॉनची विक्रमाला गवसणी

चार सुवर्णांसह सात पदके जिंकली
| टोक्यो | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियन महिला जलतरणपटू एम्मा मॅकॉनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने अनेक विक्रम नोंदवले. पोहण्यात चार सुवर्णांसह एकूण सात पदके जिंकली आहेत.

4ु100 मेडले रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमधील हे तिचे चौथे सुवर्णपदक होते. महिला म्हणून एकाच खेळात सात पदके जिंकणारी ती जगातील पहिली जलतरणपटू आहे. याशिवाय, ती ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी जगातील दुसरी महिला आहे. तिच्या आधी 1952 मध्ये रशियन जिम्नॅस्ट मारिया गोरोखोव्स्काया यांनी ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकली. या कामगिरीसह मॅकॉनने मारियाच्या विक्रमाची बरोबरी केली.
ब्रिस्बेन येथील 27 वर्षीय महिला जलतरणपटू एम्मा मॅकॉनच्या आधी तीन पुरुष जलतरणपटूंनी ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी केली होती. मायकेल फेल्प्स, मार्क स्पिट्झ आणि मॅट बियोन्डी यांचा समावेश आहे. या तीन जलतरणपटूंनी एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकली आहेत.

Exit mobile version