रोहा बसस्थानकात घाणीचे साम्राज्य

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा बसस्थानकात कचरा तसेच शेणाचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रोज रात्री शहरातील भटकी जनावरे पावसामुळे बसस्थानकात आश्रयाला येत असून, यामुळे शेणाचे, तर सफाई कामगार नसल्याने रोज सकाळी बसस्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.

रोहा बसस्थानकातून सकाळी सहा वाजल्यापासून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. या मार्गांवरचे प्रवासी तसेच शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी तसेच कामगार वर्ग यांची या ठिकाणी सकाळीच गर्दी असते. तसेच दिवसभरातदेखील अनेक प्रवासी या ठिकाणी येत असतात. पण, स्थानक परिसरात असलेला कचरा, शेण तसेच शौचालय परिसरात असणारी दुर्गंधी यामुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने एसटी महामंडळाने याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता ठेवावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Exit mobile version