वारे-देवपाडा रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण; स्थानिकांची बांधकाम विभागाकडे तक्रार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वारे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वारे-चिंचवाडी-देवपाडा रस्त्याच्या लगत मुंबईस्थित धनिकांकडून बांधकाम करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूने करण्यात आलेले ते वाहतुकीस अडथळा ठरत असून, अपघात होण्याची शक्यता वारे-देवपाडा रस्त्यावर निर्माण झाली आहे.

डर्मटान, स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या बाजूने करण्यात आलेले अतिक्रमण बांधकाम या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कर्जत तालुक्यातील वारे येथे मुंबईतील धनिकांकडून जमीन खरेदी करण्यात आली आहे. वारे-चिंचवाडी रस्त्यालगत असलेल्या सदरच्या जमिनीचा विकास करताना शासनाचे नियम धाब्यावर आहेत. रस्त्याच्या साईडपट्टीवर दगडी भिंतीचे बांधकाम केले आहे. परिणामी, त्या ठिकाणी असलेल्या वळणाच्या रस्त्यावर बांधकाम झाल्याने वाहनचालकांना समोरून येणार्‍या वाहनाचा अंदाज येत नाही. त्याचवेळी पुढे तीव्र उतार आणि मोठे वळण यामुळे हा रस्ता वाहनचालकांची धोकादायक बनला आहे. त्या बांधकामामुळे दररोज त्या रस्त्यावर अपघात होत आहेत आणि त्यामुळे स्थानिक रस्त्याच्या बाजूला करण्यात आलेली बांधकाम बाजूला करावे, अशी मागणी केली आहे.

वारे-चिंचवाडी-देवपाडा-दहिवली वंजारपाडा रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला आहे. वारे-चिंचवाडी रस्ता साईडपट्टीवर बांधकाम केल्याने अधिकच धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, अशी तक्रार पोशीर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिश्‍चंद्र निरगुडा यांनी केली आहे.

वारे चिंचवाडी रस्त्याच्या बाजूला करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार अर्ज केला आहे. त्याबाबत स्थळ पाहणी करून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येईल आणि ग्रामस्थांना माहिती देण्यात येईल.

संजय कुमार आडे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत
Exit mobile version